गजाआडील चिमुकले, मेक्सिकोच्या जेलमधील हृदयद्रावक स्थिती
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मेक्सिकोच्या जेलमधील आहेत शंभराहून अधिक चिमुकली मुलं - पाहा व्हीडिओ

मेक्सिकोतील सँटा मार्था अॅकाटित्ला या महिलांच्या जेलमधील परिस्थिती पाहिल्यानंतर कुणीही संवेदनशील माणसाचं हृदय पिळवटून निघेल. आई आणि मुलांमधील हृदयस्पर्शी नातं जेलच्या गजांमुळे कसं दुरावलं जातं, हे दिसतं.

'रिइन्सर्टा' या समाजसेवी संस्थेने पुढाकार घेतला आणि सँटा मार्था अॅकाटित्ला या जेलमध्ये राहण्यायोग्य व्यवस्था निर्माण करण्यास सुरुवात केली. महिला कैद्यांसोबत त्यांची चिमुकली मुलं राहत असल्याने, मुलांना राहता येईल, अशा पद्धतीने भिंती रंगवल्या. चांगल्या दर्जाचे पलंग तिथे आणले. महिला कैद्यांसाठी रिइन्सर्टा संस्थेने माणुसकीचा हात पुढे केला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)